Crossout Mobile हा तुमच्या मोबाईल डिव्हाईससाठी एक लेजेंडरी MMO-अॅक्शन गेम आहे. गेमच्या सुरुवातीला, तुम्ही तीनपैकी एक क्राफ्ट निवडू शकता: कॅटरपिलर ट्रॅक, स्पायडर लेग्स किंवा व्हिलसह. यापैकी प्रत्येक बिल्डचे फायदे आणि तोटे आहेत आणि बिल्डची निवड वैयक्तिक प्राधान्ये आणि टॅक्टिक्सवर अवलंबून असते. एका निर्दयी पोस्ट-अपोकॅलिप्टिक जगात 6 विरुद्ध 6 खेळाडूंच्या टीम PvP लढाईत सामील व्हा किंवा PvE मिशनमध्ये अनेक कॉम्प्युटर प्रतिस्पर्ध्यांच्या आव्हानांना सामोरे जा. पोस्ट-अपोकॅलिप्टिक गटांच्या झेंड्याखाली लढा; ते तुम्हाला नवीन भाग आणि विशेष क्षमतेचे रीवॉर्ड देतील. संसाधने आणि विजयासाठी वेड्या कार लढायांचा रोष अनुभवा!
वेडे पोस्ट-अपोकॅलिप्टिक जग एका मोठ्या युद्धभूमीमध्ये बदलले आहे. प्राणघातक सशस्त्र वाहनांमधील निर्भय आक्रमणकर्ते संसाधने आणि वर्चस्वासाठी लढतात. तुमचा स्वतःचा फुल-मेटल मॉनस्टर तयार करा आणि पोस्ट-अपोकॅलिप्टिक युद्धात तुमच्या शत्रूंचा कचरा करा! अविनाशी टँक्स आणि शक्तिशाली शस्त्रांसह, मल्टीप्लेअर अरेनामध्ये विजयाचा दावा करणे तुमच्यावर अवलंबून आहे.
*** एका टीममध्ये लढा *** 6v6 खेळाडूंसाठी PvP लढाईत सामील व्हा किंवा PVE मोडमध्ये भाग घ्या. कुळ तयार करा किंवा त्यात सामील व्हा आणि मित्रांसह खेळा. सर्वोत्कृष्ट ड्रायव्हर कोण आहे हे निर्दयी पोस्ट-अपोकॅलिप्टिक लढाया दाखवतील!
*** तुमचे अनोखे वाहन तयार करा*** एक अवजड हत्यारबंद वाहन, एक चपल बग्गी, एक बहुपयोगी वॅगन, एक लढाऊ रोबोट किंवा टॅंक – तुमच्या गेमप्लेच्या स्टाईलशी जुळणारी राईड तयार करा. तुमच्या लढाईचे वाहन नवीन भागांसह सुधारित करा जे तुम्हाला PVE मोडमध्ये बोट्स नष्ट करून किंवा इतर खेळाडूंना पराभूत करून PVP मोडमध्ये मिळू शकतात. शेकडो भाग आणि लाखों कॉम्बिनेशन!
*** अनोखे डॅमेज मॉडेल*** शत्रूच्या वाहनाचा कोणताही भाग शूट करून काढून टाका - ते स्थिर करा किंवा ते असुरक्षित ठेवा. स्नायपर पोजिशन घ्या आणि शत्रूला दुरून शूट करा किंवा जवळून लढाई करा. तुमच्या शत्रूला वेगळे करा!
*** शस्त्रास्त्रांचा प्रचंड शस्त्रागार*** मशीन गन, रॉकेट लॉंचर, मोठ्या कॅलिबर तोफा आणि अगदी मिनीगन. कोणत्याही गन्स निवडा आणि जास्तीत जास्त शक्ती मिळवण्यासाठी त्यांना एकत्र करा. वाहनांच्या घनघोर लढाईत लढा!
*** गट*** इंजिनियर, नोमॅड आणि इतर. पोस्ट-अपोकॅलिप्टिक ग्रुपच्या झेंड्याखाली लढा; ते तुम्हाला नवीन भाग आणि विशेष स्किल्ससह रीवॉर्ड देतील!
*** विस्मयकारक ग्राफिक्स*** नेत्रदीपक इफेक्ट्स, गेमिंग अरेनामधील सुंदर लँडस्केप आणि पोस्ट-अपोकॅलिप्टिक वातावरण. तुमच्या प्रतिस्पर्ध्यांवर आघाडी मिळवण्यासाठी अनेक वेगवेगळे लढाईचे अरेना एक्सप्लोर करा.
***नियमित गेम इव्हेंट्स*** अनोख्या गेममधील इव्हेंट्समध्ये भाग घ्या आणि ते पूर्ण केल्यावर दुर्मिळ रीवॉर्ड आणि अतिरिक्त अनुभव मिळवा! गेममध्ये नवीन आणि रोमांचक क्षितिजे उघडा!
*** पहिला क्रमांक मिळवा *** जगभरातील PVP मोडमध्ये वास्तविक खेळाडूंविरुद्ध लढाई करा. नियमित अपडेट्स आणि नवीन वाहनांमुळे तुम्हाला कंटाळा येणार नाही. तुमच्या मित्रांना इनव्हाईट करा आणि जीवंत राहण्याच्या युद्धांमध्ये एकत्र लढा! पोस्ट-अपोकॅलिप्टिक जगाचा सर्वात धाडसी नायक व्हा!